
पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील वाकण ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील मुरावाडी आणि धामणीचीवाडी येथे उभारण्यात आलेल्या पाणी साठवण टाक्यांचे लोकार्पण आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी कुंभळवणे ते मुरेवाडी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या वेळी राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे, युवा सेना अधिकारी संजय कळंबे, उपसरपंच तानाजी जाधव, विभागप्रमुख तानाजी निकम, लक्ष्मण साने, दशरथ उतेकर, नारायण साने, तात्याबा साने आणि विभागातील शिवसैनिक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.