Breaking News

उरणमध्ये भाजपची भव्य बाईक रॅली

उरण : वार्ताहर

मोदी सरकारने यशस्वी आठ वर्षे पूर्ण केल्यानिमित्ताने भव्य बाईक रॅलीचे आयोजन रविवारी (दि. 12) दास्तान फाटा शिवस्मारक येथे करण्यात आले होते. दरम्यान, या वेळी भाजप उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.

उरणमध्ये रविवारी काढण्यात आलेल्या बाईक रॅलीची सुरुवात शिवस्मारकाजवळून झाली. पुढे रॅली दिघोडे, चिरनेर, दिघाटी, पिरकोन, कोप्रोली, खोपटा, भेंडखळ, टाऊनशिप कॉलनी, न्हावाशेवा पोलीस स्टेशन, करळ ब्रिज, उरण चारफाटा, ओएनजीसी रोड, अंबिका वाडी, मोठे नागाव, घोसपाडा चिंबळ थळी, कुंभारवाडा, पुढे आमदार महेश बालदी संपर्क कार्यालय उरण येथे या रॅलीची सांगता करण्यात आली.

या वेळी जिल्हा उपाध्यक्ष निळकंठ घरत, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, नगरसेवक राजू ठाकूर, रायगड जिल्हा ओबीसी सेल अध्यक्ष  चंद्रकांत घरत, उरण नगर परिषद उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजप उरण तालुका युवा मोर्चा अध्यक्ष शेखर पाटील, उरण शहर युवा अध्यक्ष निलेश पाटील, उरण तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड,  हितेश शाह, तेजस पाटील, जितेंद्र ठाकूर, रमेश पाटील, भूषण म्हात्रे, शैलेश गावंड, रमेश पाटील, सुरज ढवळे, मयूर पाटील, मिथुन पुरव, सुनील पाटील, राजेंद्र पाटील, रुपेंद्र ठाकूर, मिलिंद पाटील, प्रशांत ठाकूर आदी उपस्थित होते.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply