Breaking News

देहरंग धरणातील पाणीसाठा वाढला

पनवेलकरांना दिलासा; दिवसाला 12 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा

पनवेल ः रामप्रहर वृत्त

पनवेल तालुक्यात गुरुवारी रात्रीपासून जोर धरलेल्या पावसाने पनवेलला पाणीपुरवठा करणार्‍या देहरंग धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. महापालिकेने धरणातून दिवसाला 10 ते 12 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे गेले दीड महिना सुरू असलेल्या पाणीटंचाईतून पनवेलकरांची सुटका झाली आहे. पनवेल शहराला देहरंग धरणातून पाणीपुरवठा होता, मात्र  मागणी वाढल्याने हा पाणीसाठा पनवेलकरांना अपुरा पडत आहे. त्यामुळे मार्च, एप्रिलपासूनच शहरात पाणीकपात केली जाते. त्यामुळे उन्हाळ्याचे पुढील काही महिने पनवेलकरांना पाण्याची मोठी काटकसर करावी लागत असते. पनवेलचा हा पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने अमृत योजनेअंतर्गत पाताळगंगातून पाणी उपसा करून जलवाहिनीद्वारे पनवेलला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, मात्र यासाठी आणखी दोन वर्षे लागणार आहेत. या वर्षी गेल्या दीड महिन्यापासून पनवेल दिवसाआड पाणीपुरवठा होत होता, तर गेली चार महिने आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा लागत होता. त्यात पावसाने ओढ दिल्याने हा प्रश्न आणखी गंभीर होण्याची शक्यता होती, मात्र गुरुवारपासून पावसाने चांगली सुरुवात केली आहे. त्यामुळे देहरंग धरणाची पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे पनवेल पालिकेने धरणातून दिवसाला 10 ते 12 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करणे सुरू केले.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply