पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील नावेखाडी मधलापाडा येथे शिवमंदिर जीर्णोद्धार आणि श्रींची पुनःप्रतिष्ठापना सोहळा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि. 17) उत्साहात झाला.
कै. मुक्ताबाई मोकल आणि नागेश मोकल यांच्या स्मरणार्थ सावळाराम मोकल आणि कुसुम मोकल यांनी स्वखर्चातून बांधलेल्या शिवमंदिराचा जीर्णोद्धार सोहळा विविध धार्मिक कार्यक्रम राबवून झाला. यानिमित्ताने दोन दिवस कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते श्रींची पुनःप्रतिष्ठापना झाली.
या सोहळ्याला भाजपचे ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, उद्योजक जे.एम. म्हात्रे, न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील, गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय घरत, साई डेव्हलपर्सचे विजय कडू, न्हावे ग्रामपंचायत सदस्य सागर ठाकूर, सुनिता भोईर, रंजना पाटील, जागृती म्हात्रे, अरुणशेठ ठाकूर, सी.एल ठाकूर, चंद्रकांत भोईर, मंजुषा ठाकूर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, नरेश मोकल, विलास मोकल, संदीप मोकल यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला उपस्थित राहिल्याबद्दल आभार व्यक्त केले.
Check Also
प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी बांधलेल्या घरांसंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
घरे नियमित करण्याबाबत सिडकोला निर्देश देण्याची आग्रही मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी …