Breaking News

आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून रस्ता कामाचा शुभारंभ

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त
उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून विधानसभा क्षेत्रामध्ये विविध विकासकामे केली जात आहेत. यालाच अनुसरून सोमवारी (दि. 17) ग्रामपंचायत चावणे ते सवणे गावापर्यंत रस्त्याच्या डांबरीकरणाचा भूमिपूजन सोहळा भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाला. आमदार महेश बालदी यांच्या निधीमधून आणि पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून एक कोटी 83 लाख 65 हजार 426 रुपये खर्चून हा रस्ता करण्यात येणार आहे
उरण विधानसभा मतदारसंघात आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून, तर पनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे केली जात आहेत. पूर्वी या मतदारसंघांमध्ये तुरळक कामे व्हायची, पण महेश बालदी आमदार झाल्यानंतर उरण विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक विभागात कोट्यवधींची कामे केली जात आहेत. मतदारांनी त्यांना दुसर्‍यांदा मतदानातून आशीर्वाद तुम्ही दिला. यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास निधी विभागात आल्याचे भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी या कार्यक्रमादरम्यान सांगितले.
यापूर्वी उरण मतदारसंघांमध्ये विकासाचे ठोस काम कोणी केले नव्हते, परंतु जेव्हापासून महेश बालदी मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आले तेव्हापासून या मतदारसंघाचा कायापालट करण्याचे काम त्यांनी हाती घेतले आणि म्हणूनच आपण सर्वांनी त्यांना पुन्हा एकदा मतदारसंघाची धुरा त्यांच्या हाती सुपूर्द केली, असे भाजपचे नेते किरण माळी यांनी सांगितले.
या भूमिपूजन सोहळ्याला माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत, माजी पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, तनुजा टेंबे, कराड ग्रामपंचायतीचे माजी सरपंच किरण माळी, विजय मुरकुटे, भगवान देशमुख, योगेश पाटील, दत्तात्रय देशमुख, शरद देशमुख, प्रदीप देशमुख, पंचायत समिती विभागीय अध्यक्ष संदीप पाटील, कृष्णा कोंडिलकर, गणेश सरदार, उमेश सरदार, कैलास देशमुख, आनंद देशमुख, गोविंद गजानन, हरिभाऊ देशमुख, दिलीप देशमुख, रघुनाथ देशमुख, बाळकृष्ण साठे, रत्नराज देशमुख, सुरेश देशमुख, शैलेश बर्वे, प्रकाश देशमुख, यशवंत देशमुख, सचिन देशमुख, इशा देशमुख, निकिता सरदार यांच्यासह सवणे ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी बांधलेल्या घरांसंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

घरे नियमित करण्याबाबत सिडकोला निर्देश देण्याची आग्रही मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी …

Leave a Reply