उरण : रामप्रहर वृत्त
कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील आय.क्यू.ए.सी. आणि अॅन्टी रॅगिंग कमिटी तसेच उरण तालुका विधी सेवा समिती व उरण तालुका वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात कायदेविषयक जनजागृती शिबिर घेण्यात आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. बळीराम एन. गायकवाड हे होते. तर प्रमुख अथिती मा. अॅड.निलेश एम. वाली (दिवाणी न्यायाधिश क. स्तर, उरण) उपस्थित होते. अॅड.डी.व्ही.नवाले (अध्यक्ष उरण बार असोशिएशन) तसेच अॅड.किशोर ठाकूर, अॅड. पराग म्हात्रे, अॅड. मच्छिंद्र घरत, अॅड. वृक्षाली पाटील, अॅड. प्रज्ञा सरवणकर, अॅड. सोनल वार्डे, अॅड. अमर पाटील, अॅड. धिरज डाकी, अॅड. जिविका डाकी, अॅड. सबा सिद्दिकी आदी उपस्थित होते. या वेळी अॅन्टी रॅगिंग कायदा, वाहतूक नियम, अॅसिड अॅटक कायदे, ड्रग्ज व अमली पदार्थ सेवन नियंत्रण इत्यादी विषयीचे विविध कायदे, शिक्षा, दंड व तरतूदी यासंबंधीची सविस्तर माहिती विदयार्थ्यांना सांगितली गेली. कार्यक्रमाचे आयोजन व सुत्रसंचलन अॅन्टी रॅगिंग कमिटीचे अध्यक्ष प्रा. के. ए. शामा यांनी केले, तर उपस्थितांचे आभार आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. ए. आर. चव्हाण यांनी व्यक्त केले.