Breaking News

भावनिक पोस्ट शेअर करीत युसूफ पठाणची निवृत्ती

मुंबई : प्रतिनिधी
भारतीय क्रिकेट संघाचा स्फोटक फलंदाज युसूफ पठाणने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. याची माहिती त्याने स्वत: सोशल मीडियावरील पोस्टद्वारे दिली.
निवृत्तीची घोषणा करताना युसूफ म्हणाला, मी माझ्या कुटुंबाचे, मित्रांचे, चाहते, संघ, प्रशिक्षक आणि संपूर्ण देशाचे मनापासून आभार मानतो की त्यांनी मला साथ दिली आणि खूप प्रेम दिले.
युसूफ पठाण म्हणाला, मला आजही आठवतेय जेव्हा मी प्रथम भारतीय जर्सी घातली होती, त्या दिवशी मी फक्त इंडियाची जर्सी घातलेली नव्हती, तर माझे कुटुंब, मित्र, प्रशिक्षक आणि संपूर्ण देशाच्या स्वप्नांना माझ्या खांद्यावर घेतले होते. मी लहानपणापासूनच क्रिकेटमध्येच माझे आयुष्य व्यतीत केले आहे. मी माझ्या कारकिर्दीत देशाकडून खेळलो, घरगुती क्रिकेट खेळलो आणि आयपीएलमध्येही खेळलो.
आपल्या कारकिर्दीतील एका अविस्मरणीय क्षणाचा संदर्भ देताना तो म्हणाला, की भारतासाठी वर्ल्डकप जिंकणे आणि सचिनला खांद्यावर उचलून घेणे माझ्या कारकिर्दीतील एक अविस्मरणीय क्षण आहे. आता माझ्या क्रिकेटवर पूर्णविराम लावण्याची वेळ आली आहे.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply