लंडन ः वृत्तसंस्था
इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूट हा फिरकीचा यशस्वी सामना करणारा देशाचा सर्वकालीन सर्वोत्कृष्ट खेळाडू असून, आतापर्यंत आमच्या फलंदाजांनी नोंदविलेले सर्व विक्रम तो मोडीत काढेल, असे भाकीत माजी कर्णधार नासिर हुसेन याने नुकतेच केले. रूटने चेन्नई कसोटीत भारताविरुद्ध पहिल्या डावात 218 धावांची दमदार खेळी केली. स्काय स्पोर्ट्ससाठी लिहिलेल्या स्तंभात नासिर म्हणाला की, रूट हा इंग्लंडच्या महान खेळाडूंपैकी एक आहे. तो शक्यतो सर्वच विक्रम मोडेल. सर लिस्टर कुकच्या 161 कसोटी सामन्यांनाही तो मागे टाकेल.
कुकच्या धावादेखील तो मागे टाकू शकतो. रूट केवळ 30 वर्षांचा आहे. सध्या तो शानदार फॉर्ममध्येही आहे. इंग्लंडच्या महान खेळाडूंची यादी तयार केल्यास कुक, ग्रॅहम गुच आणि केव्हिन पीटरसनसोबतच रूटदेखील असेल. माझ्या मते रूट हा फिरकीला समर्थपणे तोंड देणारा इंग्लंडचा सर्वकालीन महान खेळाडू ठरतो. त्याला स्विप मारताना पाहणे फारच शानदार ठरते. भारताविरुद्ध त्यांच्या खेळपट्टीवर मोठा विजय ही परफेक्ट कामगिरी आहे. इंग्लंडचा हा सर्वोत्कृष्ट कसोटी विजय ठरला.
जाणकारांनी इंग्लंडला कमकुवत मानले होते. भारत 4-0ने जिंकेल, असे अनेकांचे वक्तव्य होते. कुणीही संघाला अधिक संधी दिली नव्हती. भारताने ऑस्ट्रेलियात मालिका विजय साजरा केला. कोहलीचे संघात पुनरागमन झाले. भारतात आयोजित सामना जिंकणे फारच कठीण असते. इतक्या सर्व आव्हानांवर मात करीत रूटने नेतृत्वाची चमक दाखवली, असेही हुसेनने म्हटले आहे.
Check Also
शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित
पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …