रेवदंडा : प्रतिनिधी
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हात लॉकडाऊन पुकारला असून संचारबंदीसुद्धा लागू आहे. तरीही रेवदंडा येथे घरमालकाच्या संमतीने जुगार अड्डा सुरू असल्याने पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. या प्रकरणी आठ जणांवर रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
रेवदंडा छोटे बंदर समुद्रालगतच्या नवीन वसाहतीमध्ये जितेंद्र नारायण म्हात्रे यांच्या घरी जुगार सुरू असल्याची खबर रेवदंडा पोलिसांना लागली. त्यानुसार पोलीस पथकाने छापा टाकून दुशांत झावरे, सुशांत बनिया, रामबच्चन झावरे, सुनील साखळे, विजय शंकर बांदिवडेकर, जयवंत थळे यांना रंगेहाथ पकडले तसेच आठ हजार 900 इतकी रोख रक्कम जप्त केली. या प्रकरणी रेवदंडा पोलिसांनी संबंधित घरमालकासह एकूण आठ जणांवर जुगार अधिनियम 1867, 4, 5, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 2005चे 51 ब आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37/1, 3, 135, कोविड-19 उपाययोजना नियम 2020चे नियम 11चे उल्लंघन तसेच साथरोग अधिनियम 1897चे कलम 2, 3, 4प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.