Breaking News

खारघरमध्ये पे पार्किंग करण्याची मागणी

भाजप नेते प्रभाकर घरत यांचे पमपा प्रशासनाला निवेदन

खारघर : रामप्रहर वृत्त

खारघर सेक्टर 4मधील रस्त्यावर पे पार्किंग करण्याची मागणी भाजप नेते प्रभाकर घरत यांनी पनवेल महापालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. घरत यांनी निवेदनात म्हटले आहे की, बेलपाडा खारघर सेक्टर 3 बेलपाडा गाव शेजारी असलेल्या गॅरेजच्या दुकानांमुळे मोठ्या प्रमाणात गाड्या रिपेरिंगसाठी उभ्या असतात. तसेच अन्य गाड्याही अनधिकृतपणे उभ्या असतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना तसेच वाहनचालकांना या उभ्या गाड्यांचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पनवेल महापालिकेतर्फे या उभ्या गाड्यांसाठी पे पार्किंग करावी. जेणेकरून एका दिशेने उभ्या राहिल्या जातील. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल. यासोबतच पे पार्किंगमुळे पनवेल महापालिकेकडे पैसे जमा होतील. लवकरात लवकर पे पार्किग लागू करावी, अशी विनंतीही घरत यांनी निवेदनात नमूद केली आहे.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply