Breaking News

सातार्‍यातील ‘त्या’ तक्रारीत तथ्य नाही : निवडणूक आयोग

मुंबई : सातारा लोकसभा पोटनिवडणूक आणि कोरेगाव विधानसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान सोमवारी (दि. 21) मतदान केंद्र क्रमांक 250 नवलेवाडी येथे ईव्हीएममध्ये बिघाड होऊन कोणत्याही उमेदवारासमोरील बटण दाबल्यास मत कमळाला अर्थात भाजपच्या उमेदवाराला जात असल्याचे वृत्त स्थानिक ग्रामस्थांच्या हवाल्याने माध्यमांमधून प्रसिद्ध झाले होते, मात्र सातार्‍यातील संबंधित मतदान केंद्रावर असे काही घडले नसल्याचे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिले आहे. याबाबत स्थानिक निवडणूक निर्णय अधिकारी कीर्ती नलावडे यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रतिनिधी दीपक पवार यांनी दुपारी आक्षेप घेतल्यानंतर त्यांना संबंधित केंद्राध्यक्षांनी चाचणी मतदानासाठी जोडपत्र 15 भरून देण्यास सांगितले, मात्र त्यांनी तसे करण्यास नकार दिला. त्यानंतर संबंधित मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरू होती.

Check Also

उलवे नोडमध्ये गुरुवारपासून ‘नमो चषक’

पनवेल : रामप्रहर वृत्तलोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल व …

Leave a Reply