Breaking News

तिसर्या लाटेला थोपविण्यासाठी उरणमध्ये सज्जता

शहरासह तालुक्यात कोरोनाच्या नियंत्रणासाठी जनजागृती

उरण : वार्ताहर

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना शासनाच्या आकडेवारीनुसार पुढील काही आठवड्यात तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. उरण तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच कोरोना विषय नागरिकांमध्ये जागृकता वाढविण्यासाठी उरण येथील तहसील कार्यालय, उरण पंचायत समिती, डीओएचसी तसेच उरण मेडीकल असोसिएशन यांचेमार्फत जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे.

त्या अनुषंगाने उरण नगर परिषद परिसरात जनजागृती करण्यासाठी रविवारी (दि. 27) नगर परिषद सभागृह येथे कोरोना विषाणूबाबत जनजागृतीपर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. कोरोना विषाणूबाबत जनजागृतीकरीता मार्गदर्शक म्हणून  उरण मेडीकल वेल्फेअर असोशिएशनचे अध्यक्ष  डॉ. विकास मोरे व सदस्य डॉ राहूल साठे यांनी उपस्थित राहुन कोरोनाबाबत  माहिती दिली. जनजागृती मोहिमेला सहकार्य केले. कोरोना होऊ नये त्यासाठी कोणती काळजी  घेतली पाहिजे त्या बद्दल सविस्तर महिती दिली.

या वेळी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, भाजप उरण तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, नगरसेवक कौशिक शाह, मुख्याधिकारी संतोष माळी, लायन्स क्लबचे प्रकाश नाईक, नगरसेविका तथा आरोग्य सभापती यास्मिन गॅस, नगरसेवक धनंजय कडवे, नगरसेविका स्नेहल कासारे, रायगड जिल्हा केमिस्ट असोशिएशनचे ऑफिस बेरर मनोज जगन्नाथ ठाकूर, उरण तालुका केमिस्ट असोशिएशनचे सदस्य गिरीश परीहारीया, डॉ. प्रीती गाडे, अफजल भाटकर, भाजप उरण शहर महिला अध्यक्ष संपूर्णा थळी, विशाल गाडे, प्रमिला गाडे, वी.क्लबच्या नयना पाटील, प्रमिला गाडे, मी उरणकर सामाजिक संस्थेचे विशाल पाटेकर, अफजल भाटकर, बौद्धजन पंचायत समितीचे प्रकाश कांबळे, नयना पाटील आदी उपस्थित होते.

उरण : वार्ताहर

उरण तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये कोरोना लसीकरण आणि कोरोना विषाणूच्या तिसर्‍या लाटेपासून सुरक्षित राहण्यासाठी कोणकोणती खबरदारी घेतली पाहिजे. या संदर्भात जनजागृती मोहीम यशस्वी रित्या झाली.

तहसीलदार भाऊसाहेब अंधारे आणि महसूल विभाग, गट विकास अधिकारी निलम गाडे आणि पंचायत समिती विभाग, उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विकास मोरे सेक्रेटरी डॉ. सत्या ठाकरे, डॉ सुरेश पाटील, तसेच समर्पित कोविड हेल्थ सेंटरचे प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज भद्रे, उरण तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र इटकरे यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविण्यात आली.

त्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सरपंच, उपसरपंच, तलाठी, ग्रामसेवक, सदस्य आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांनी चिरनेर आणि कळंबुसरे तर प्रा. राजेंद्र मढवी यांनी खोपटा  येथे मार्गदर्शन केले. डॉ. सुरेश पाटील, डॉ. विकास मोरे, डॉ. सत्या ठाकरे, डॉ. राहुल साठे, डॉ. सुरज मढवी, डॉ. अविनाश तांडेल, डॉ. अजय कोळी, डॉ. हरी ओम म्हात्रे, डॉ. अजय लहासे  यांनी केगाव, नागाव, म्हातावली, फुंडे,  चाणजे, भेंडखळ, जसखार, करंजा यांनी ह्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन मार्गदर्शन केले, तसेच कोरोनाच्या तिसर्‍या लाटेवर नियंत्रण मिळविण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. काही ग्रामपंचायतींमध्ये पुढील आठवडी्यातील मासिक ग्रामसभेच्या आधी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply