Breaking News

पारा घसरल्याने ग्रामीण भागात पेटू लागल्या शेकोट्या

माणगाव ः प्रतिनिधी

पावसाळा संपता संपता वेध लागतात ते हिवाळ्याचे आणि गुलाबी थंडीचे. हिवाळ्याच्या दिवसात सकाळी सकाळी पडणारे दाढ धुके आणि बोचणारी थंडी सर्वांना हवीहवीशी वाटते. या थंडी बरोबरच उबदार कपडे आणि चौकातून, घराबाहेर, घरांच्या कोपर्‍यांवर उब देण्यासाठी केलेल्या शेकोट्या आणि त्यांच्या भोवती गोलाकार बसून शेकोटीचा आनंद घेणारे नागरिक गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र दिसू लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून गारवा वाढत चालल्याने अनेक ठिकाणी शेकोट्या दिसू लागल्या आहेत. अडगळीतील लाकडे, पालापाचोळा इत्यादींचा वापर करून या शेकोट्या केल्या जातात. अनेक ठिकाणी हिवाळ्यासाठी खास मोठे लाकूड, ओंडके शेकोटीकरिता ठेवले जाते. दररोज ते पेटवून शेकोटी केली जाते. लहान मुले, स्त्री-पुरुष, वृद्ध, तरुण सर्वजण या शेकोट्यांचा आनंद घेतात. सार्वजनिक ठिकाणी, चौकात तर आवर्जून शेकोट्या केल्या जातात. सकाळी अगदी सूर्याची किरणे जाणवेपर्यंत शेकोटीचा आनंद घेतला जातो. हिवाळा आणि शेकोटीचा हा कार्यक्रम सर्वांच्या जीवनातील आनंदाचा भाग असून गाणी, गप्पा, विनोद आणि मनोरंजनाची वेगळी अशी पर्वणी यानिमित्ताने सर्वांना मिळते आहे .ठराविक गावाचे नाव घेऊन त्या गावचा म्हातारा शेकोटीला आला असे गीत हमखास या शेकोटीमधून ऐकायला मिळते.

महाबळेश्वर पाचगणीत वाढला थंडीचा कडाका

वाई ः सातारा जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला असून राज्याचे मिनी काश्मीर म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर आणि पाचगणी येथे तापमानाचा पारा घसरला आहे. आज सकाळी तापमानाचा एकदम कमी आला होता, तर वेण्णालेक परिसरात तापमान घसरले आहे. मागील काही दिवसांपासून महाबळेश्वर पाचगणीत दिवसरात्र थंडीचा अनुभव येत आहे. सध्या महाबळेश्वर मध्ये पर्यटकांची शनिवार व रविवार सुट्टी असल्याने पर्यटकांची रेलचेल पाहायला मिळत आहे. सकाळ- सकाळी थंडीचा कडाका, दिवसभर निसर्गाचा आनंद व रात्री उशिरापर्यंत मार्केटमध्ये खरेदी- विक्री करण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने महाबळेश्वरमध्ये दाखल होत आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाचगणी फेस्टिव्हल चे आयोजन करण्यात आले असून पर्यटक या फेस्टिव्हलची माहिती घेत आहेत.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply