Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेल तालुक्यात विकासकामे

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आणि पनवेलचे कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून मतदारसंघात विकासाची अनेक कामे सातत्याने सुरू असतात. अशाच प्रकारे त्यांच्या निधीतून मोर्बे, कुत्तरपाडा, महोदर कातकर वाडी आणि नितळस येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.1) करण्यात आले.
आमदार प्रशांत ठाकूर यांचा स्थानिक ग्रामविकास निधी (25.15) आणि सामाजिक विकास योजनेंतर्गत मोर्बे येथे हनुमान मंदिर ते गावदेवी मंदिर रस्ता काँक्रीटीकरण करणे, अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे आणि बौद्धवाडा अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे ही कामे करण्यात येणार आहेत. कुत्तरपाडा येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जिल्हा वार्षिक योजनेतून स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता तयार करण्यात येणार आहे. नितळस येथे मुख्य रस्ता डांबरीकरण करणे, व्यायामशाळा नूतनीकरण करणे आणि बैठक हॉलकडे जाणारा रस्ता काँक्रीटीकरण करणे ही कामे करण्यात येणार आहेत. या सर्व कामांचे भूमिपूजन झाले, तर महोदर कातकरीवाडी येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जिल्हा वार्षिक योजनेतून रस्ता साकारला आहे. त्याचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमास भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, प्रल्हाद केणी, विश्वजीत पाटील, मोर्बे येथे भाजपचे विभागीय अध्यक्ष बाळाराम उसाटकर, उपसरपंच प्रभावती परशुराम नावडेकर, ग्रामपंचायत सदस्य रमेश नावडेकर, सुवर्णा जनार्दन भगत, एकनाथ नाईक, माजी सरपंच नारायण भगत, भगवान म्हात्रे, रामदास म्हात्रे, दिनेश फडके, जनार्दन भगत, परशुराम नावडेकर, जयवंत खोपकर, हरिश्चंद्र नावडेकर, चंद्रकांत पाटील, सचिन फडके, पिंटू म्हात्रे, कोंडले माजी सरपंच जनार्दन कोळंबेकर, अरुण पाटील (वाकडी), जीवन नावडेकर, हभप हेदरबुवा भोपी (रिटघर), रघुनाथ नावडेकर, प्रभाकर नावडेकर, रवींद्र पाटील (कोंडले), बाळाराम पाटील, सचिन दिसले (खानाव), बळीराम भोईर, एकनाथ फराड (खानाव); कुत्तरपाडा येथे शिरवली ग्रामपंचायत सरपंच रखुमार्ई हरिभाऊ बोंडे, उपसरपंच नंदा लक्ष्मण पाटील, माजी उपसरपंच भाऊदास शिनारे, भाजप कार्यकर्ते लक्ष्मण पाटील, तुकाराम आदईकर, सीताराम आदईकर, दीपक बोंडे, चंदर आदईकर, नारायण आदईकर, कातोर पाटील, अनंता पाटील, वामन आदईकर, कैलास आदईकर, गणेश आदईकर, अनंता पाटील, हरिश्चंद्र पाटील, गुरूनाथ पाटील, सुरेश पाटील, आंबे आदईकर, संतोष आदईकर, नंदू भोईर, आबो आदईकर, चंद्रकांत भगत, बाबुराव भगत, महेश पाटील, लहू मुंढे, राकेश पाटील, आकाश पाटील, रोहिदास वाघमारे, अनंता पारधी, बाळाराम भगत, सोमा हिंदोळा; महोदर येथे शिरवली सरपंच दीपक बोंडे, महोदर उपसरपंच नंदा लक्ष्मण पाटील, लहूदास शिनारे, लक्ष्मण पाटील, चंद्रकांत भगत, बाबुराव भगत, महेश पाटील, राकेश पाटील, आकाश पाटील, रोहिदास वाघमारे, अनंता पारधी, नंदू पारधी, चंद्रभागा भगत; नितळस येथे धर्मा पावशे, शरद पावशे, कैलास मढवी, भार्गव सांगडे, जयराम काठे, सोपान काठे, कैलास पावशे, शरद पाटील, रमाकांत पावशे, साजन पावशे, उदय सांगडे, मारूती पावशे, वसंत पावशे, धनाजी म्हात्रे, हनुमान पाटील, भास्कर मढवी, प्रकाश मढवी, राजेश पावशे, शशिकांत साठे, अविनाश गायकर, चंद्रकांत पावशे, भरत चौधरी, नंदू भोपी, अशोक भोपी, प्रमोद पावशे, रोशन पावशे, रोहित सांगडे, मुकेश पावशे, ग्रामपंचायत सदस्य दर्शना पावशे, सुमिता काठे, प्रल्हाद मढवी, संदीप मढवी, काठे, दिनेश काठे, भगवान चौधरी, शरद भोईर, संजय भोईर, प्रमोद भोईर, विनोद भोईर, हरिश्चंद्र भोईर, हरिश्चंद्र पावशे, बाळकृष्ण पावशे, बामा पावशे, बामा पावशे, माया पाटील, शिवाजी दरे, संकेत पावशे, राजेश काठे, धनाजी काठे, महेश भोपी, रूतिक दरे, तुळशीराम भोपी, संतोष म्हात्रे, डॉ.समिर पावशे, डॉ.गजानन पावशे, परशुराम पावशे, शुभम पावशे, रामाकांत पावशे, तानाजी काठे, सोमनाथ सांगडे, ज्ञानेश्वर गायकर, लालू गायकवाड, किशोर पावशे, प्रियांशू मढवी, रोशन कातकरी आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

गणेशोत्सवानिमित्त सोमवारी शिवाजीनगर येथे श्री सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन

पनवेल : रामप्रहर वृत्त गणेश उत्सवानिमित्त सोमवारी (दि. 9) शिवाजीनगर येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ …

Leave a Reply