Thursday , March 23 2023
Breaking News

सोनारीत आज मतदान

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर

उरण तालुक्यातील सोनारी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज झाली असून, रविवारी (दि. 24) होणार्‍या थेट सरपंच आणि तीन प्रभागांतील नऊ सदस्यांच्या निडणूक प्रक्रियेसाठी रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे तीन मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.या ग्रामपंचायतीमध्ये 896 पुरुष व 896 महिला अशी एकूण 1792 मतदार संख्या आहे; तर एक थेट सरपंचपदासाठी दोन उमेदवार आणि तीन प्रभागांतील नऊ सदस्यपदांसाठी 18 असे एकूण 20 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. प्रत्येक मतदान केंद्रात एक निवडणूक निर्णय अधिकारी, तीन कर्मचारी व एक पोलीस शिपाई अशी व्यवस्था करण्यात आली असून,  मतदानाची वेळ सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत आहे.

Check Also

सराईत सोनसाखळी चोरांना अटक

जवळपास पावणेपाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत पनवेल : वार्ताहर खारघर, उलवेसह नवी मुंबई परिसरात …

Leave a Reply