उलवे नोडमधील धक्कादायक प्रकार
पनवेल : वार्ताहर
उलवे नोडमधील आयएमएस गु्रप ऑफ स्कूलचा चालक चक्क दारू पिऊन बस चालवत असल्याचा प्रकार मंगळवारी (दि. 13) घडला. त्यामुळे बसमधील मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मद्यधुंद चालकाने विद्यार्थ्यांनी भरलेली बस ही उभ्या असलेल्या रिक्षेला ठोकली. त्या वेळी या बसचालकाला उभेही राहता येत नव्हते. सुदैवाने अपघातात कोणत्याही विद्यार्थ्याला इजा झाली नाही, मात्र यामुळे स्कूल बसमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा एकदा ऐरणीवर आला आहे. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी या दारूड्या चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले.