Breaking News

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा बैठकांवर भर

पनवेलमध्ये तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी घेतला आढावा

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यात 10 ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली नितळस, नेरे, शिवकर आणि शिरढोण येथे मंगळवारी (दि. 13) आढावा बैठका झाल्या.
या बैठकांना भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, माजी पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, ज्येष्ठ नेते के. सी. पाटील, प्रकाश खैरे, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, केळवणे विभागीय अध्यक्ष मंगेश वाकडीकर, अंकुश पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी युवा नेते भूपेंद्र पाटील यांना उपस्थित मान्यवरांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
ग्रामपंचायत निवडणूक जसजशी जवळ येत चालली आहे तशी रंगत वाढत चालली आहे. या निवडणुकीत भाजप व मित्रपक्षांच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे. या निवडणुकीसाठी येत्या रविवारी म्हणजेच 18 डिसेंबरला मतदान होणार आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेलमधील कानपोलीत विकासकामे

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत …

Leave a Reply