Breaking News

पार्थ पवार यांना अखेर मावळमधून उमेदवारी जाहीर

पार्थ पवार यांना अखेर मावळमधून उमेदवारी जाहीर

मुंबई : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी (दि. 15) आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत पक्षाचे बडे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना अखेर मावळमधून उमेदवारी घोषित झाली आहे. यादीतील बहुतांश उमेदवार नवखे आहेत.

दुसर्‍या यादीत राष्ट्रवादीने 12 उमेदवार जाहीर केले आहेत. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे अभिनेते अमोल कोल्हे यांना शिरूरमधून उमेदवारी जाहीर झाली आहे. ते शिरूर मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढणार असल्याची आधीपासूनच चर्चा होती. राष्ट्रवादीचे दुसरे मोठे नेते छगन भुजबळ यांचे पुत्र समीर यांना नाशिकमधून उमेदवारी जाहीर झाली आहे. नाशिकच्या शेजारी असलेल्या दिंडोरीमधून धनराज महाले, तर बीडमधून बजरंग सोनावणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या कोट्यातील माढा आणि अहमदनगर या दोन प्रमुख मतदारसंघांतील उमेदवार अद्याप जाहीर करण्यात आले नाहीत. या दोन्ही मतदारसंघांतील उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply