Breaking News

आयपीएलसाठी तीन पर्याय

मुंबई ः प्रतिनिधी

कोरोना प्रादुर्भावामुळे स्थगित करण्यात आलेली इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)चा दुसरा टप्पा आता भारताबाहेरच होणे शक्य आहे. याकरिता संयुक्त अरब अमिराती (यूएई), इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे तीन पर्याय उपलब्ध असल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्रांनी दिली.

आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी उर्वरित सामने परदेशात खेळवण्याचा प्रस्ताव भागधारकांना मान्य आहे. ‘आमच्याकडे आयपीएलचे उर्वरित 31 सामने पूर्ण करण्यासाठी आलेल्या प्रस्तावांचा आम्ही गांभीर्याने विचार करीत आहोत,’ असे बीसीसीआयच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले. भारताचा इंग्लंड दौरा 14 सप्टेंबरला संपत असून, त्यानंतर आयपीएलचा दुसरा टप्पा खेळवण्याबाबत चर्चा सुरू आहे.

आयपीएलचा मागील हंगाम बीसीसीआयने यूएइमध्ये यशस्वी करून दाखवला होता. भारतामधून ट्वेण्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा हलवण्याचा निर्णय घेतल्यास यूएइ हाच पर्याय उपलब्ध आहे.

भारतीय संघ मेअखेरीस जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यासाठी इंग्लंडला जाणार आहे. त्यानंतर इंग्लंडशी पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर तिथेच आयपीएलचा दुसरा टप्पा खेळवता येऊ शकतो. आयपीएलच्या दुसर्‍या टप्प्यातील सामन्यांसाठी मिडलसेक्स, सरे, वॉर्विकशायर आणि लँकेशायर या चार इंग्लिश कौंटी संघांनी उत्सुकता दर्शवली आहे.

याशिवाय ऑस्ट्रेलियातील सरकारने येत्या चार महिन्यांत आपले हवाई धोरण बदलल्यास हा पर्याय अधिक सुरक्षित असेल.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply