पनवेल ः रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स (सीकेटी) (स्वायत्त) महाविद्यालयातील नॅशनल कॅडेटस् कौर (एनसीसी) कॅडेट्सची रिपब्लिक डे कॅम्पसाठी यावर्षीही निवड झाल्याने महाविद्यालयाच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा खोवला गेला आहे. महाराष्ट्र संचालनालया अंतर्गत मुंबई ग्रुप-अ मधून एकूण 111 कॅडेटची या रिपब्लिक डे कॅम्पसाठी निवडकरण्यात आली आहे, यामध्ये महाविद्यालयातील नॅशनल कॅडेटस् कौरचे कॅडेटस सिनियर अंडर ऑफिसर ओमकार देशमुख आणि सीडीटी प्रणाली चव्हाण यांचीही निवड करण्यात आली. या निवड प्रक्रियेसाठी मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये आणि पुणे मुख्यालय येथे आयोजित एकूण नऊ कॅम्पमध्ये हे कॅडेटस सहभागी होऊन अथक परिश्रम करून हे यश मिळविले. त्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. पाटील, आयक्यूएसी समन्वयक डॉ. बी. डी. आघाव, नॅशनल कॅडेटस् कौर विभागाचे प्रमुख प्रो. डॉ. यू. टी. भंडारे आणि केअर टेकर ऑफिसर प्रा. एन. पी. तिदार, विज्ञान शाखाप्रमुख डॉ. जे. एस. ठाकूर, डॉ. एलिझाबेथ मॅथ्यूज, डी. एस. बर्वे, प्राणीशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. एम. ए. म्हात्रे तसेचश्री. किशोर देवधेकर,अध्यक्ष, दृष्टी फाउंडेशन आणि प्रदीप दावकर, रोटरी क्लब, पनवेल हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी नॅशनल कॅडेटस् कौरचे महाविद्यालयीन जीवनातील महत्त्व अधोरेखितकेले व कॅडेटसनी मिळविलेल्या दैदिप्यमान यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर आणि सचिव डॉ. एस. टी. गडदे यांनी आयोजकांचे कौतुक केले.