Breaking News

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात प्रशिक्षण शिबिर

खारघर ः रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात गुरुवारी (दि. 15) आजीवन अध्ययन व विस्तार विभागातर्फे आजीवन व अध्ययन व विस्तार विभागातील विद्यार्थ्यांसाठी प्रथम सत्र प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षण कार्यक्रमासाठी चांगु काना ठाकूर आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाचे क्षेत्र समन्वयक प्रा. डॉ. बी. एस. पाटील हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. महाविद्यालयातील डीएलएलईच्या सुमारे 150 विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे उपस्थितीना डीएलएलई अंतर्गत करण्यात येणार्‍या सहा प्रकल्पांची सविस्तर माहिती  व प्रकल्प कसे लिहावेत याविषयी माहिती देण्यात आली. प्रस्तुत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रुपेंद्र गायकवाड यांनी विद्यार्थी व विद्यार्थिनींना प्रशिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणाचे आयोजन आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे समन्वयक प्रा. महेश धायगुडे यांनी केले, तसेच प्रा. योगिता पाटील, प्रा. प्रथमेश उदेकर, प्रा. विशाल देशमुख, प्रा. डॉ. फारुख शेख, प्रा. सफिना मुकादम यांनी व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी सहकार्य केले. या प्रशिक्षण कार्यक्रमाबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष अरुण शेठ भगत, संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख व संस्थेचे सचिव डॉ. सिद्धेश्वर गडदे यांनी कौतुक केले.

Check Also

सरके चुनर… हटाव मोहीम सफल

गाणं कोणतेही का असेना ते लिहिताना, स्वरबद्ध करताना, त्यावर संगीतसाज चढवताना, त्याचे चित्रीकरण करताना, त्यावरची …

Leave a Reply