Breaking News

“हिंदू धर्मद्वेषी सुषमा अंधारेंवर गुन्हा दाखल करा”

खालापुरातही वारकरी आक्रमक; पोलिसांना निवेदन

खोपोली : प्रतिनिधी
हिंदू देवदेवता आणि साधू-संतांविषयी वारंवार बेताल वक्तव्ये करून हिंदू धर्म आणि वारकरी संप्रदायाचा अपमान करणार्‍या, जातीय तेढ निर्माण करणार्‍या आणि कायदा सुव्यवस्थेचा भंग करणार्‍या शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन खालापूर तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीने शनिवारी (दि. 17) जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना खालापूर येथे देण्यात आले.
सुषमा अंधारे या पुरोगामी विचाराचे पाढे वाचत असताना जाणूनबुजून हिंदू धर्माविषयी, साधू-संतांविषयी अवमानजनक वक्तव्ये करीत आहेत. त्यामुळे वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या आहेत. म्हणूनच अंधारेंवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आम्ही निवेदनाद्वारे करीत असल्याचे काशिनाथ पार्ठे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक घार्गे यांच्यासमवेत तहसीलदार आयुब तांबोळी हेही उपस्थित होते.
खालापूर पोलीस ठाण्यात निवेदन देतेवेळी ह. भ. प. रमेश महाराज सावंत, दिगंबर महाराज सणस, शिवाजी महाराज महाडिक, बंधूराज महाराज जांभळे, किशोर महाराज पाटील, अनंत महाराज बोरले, भगवान महाराज पाटील, उद्धव महाराज देशमुख, किरण महाराज ठाकरे, अमोल बांदल पाटील, प्रसिद्ध पार्ठे, संतोष पिंगळे, दीपक जगताप, छत्तीसकर यांच्यासह वारकरी संप्रदायाचे सदस्य उपस्थित होते.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply