Breaking News

खातेदारांना दिलासा; 10 हजार काढता येणार

मुंबई : प्रतिनिधी

सहा महिन्यातून एकदाच एक हजार रुपये काढण्याचे लादलेले आर्थिक निर्बंध पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेने (पीएमसी) आज अखेर अंशतः मागे घेतले आहेत. सहा महिन्यातून एकदा एक हजाराऐवजी 10 हजार रुपये काढण्याची मुभा पीएमसी बँकेने ग्राहकांना दिली आहे, मात्र बँकेच्या या निर्णयावरही ग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे. आमचे पैसे बँकेतून काढण्यावर आम्हालाच का मनाई करण्यात येत आहे? 10 हजारात सहा महिने घर कसे चालवायचे? असे सवाल या ग्राहकांनी उपस्थित केले आहेत. आरबीआयच्या आदेशानंतर पीएमसीने ग्राहकांची त्यांच्या खात्यातून रक्कम काढण्याची लिमिट वाढवली आहे. नव्या नियमानुसार ग्राहक आता पीएमसी बँकेतून सहा महिन्यातून फक्त 10 हजार रुपये काढू शकणार आहेत. त्याआधी ही मर्यादा केवळ एक हजार रुपयांची होती. आरबीआयच्या बॅकिंग रेग्युलेशन अ‍ॅक्ट 1949च्या सेक्शन 35 अ अंतर्गत ही कार्यवाही करण्यात आली आहे. पीएमसी बँकेने सहा महिन्यातून केवळ एक हजार रुपये काढता येणार असल्याचा फतवा काढल्याने ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण होते. त्यामुळे ग्राहकांनी आंदोलने-निदर्शनेही केली होती. बँकेविरोधातील ग्राहकांच्या वाढत्या रोषामुळे पीएमसीला काहीशी माघार घ्यावी लागली असून, त्यांना बँक खात्यातून काढावयाच्या रकमेत वाढ करावी लागली आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply