Breaking News

घोट गावात विविध विकासकामे

रस्तेे डांबरीकरण भूमिपूजन व सेल्फी पॉईंटचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिका क्षेत्रात भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकासाची कामे मार्गी लागत आहेत. त्या अंतर्गत आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तसेच नवनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली घोट गावात महापालिकेमार्फत रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 17) झाले. दरम्यान, या वेळी नितेश पाटील यांच्या स्वखर्चातून घोट गावात ‘आय लव्ह घोट गाव’ हे सेल्फी पॉईंट उभारण्यात आले असून याचे परेश ठाकूर आणि माजी नगरसेवक हरेश केणी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. पनवेल भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने व सततच्या पाठपुराव्याने तसेच नवनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महापालिका प्रभाग क्रमांक 1 फेज-2 ते घोटनदी तसेच स्मशानभूमीतलगतच्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम नितेश पाटील यांच्या प्रयत्नांमुळे तातडीने मंजुर झाले असून या कामाचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. या वेळी माजी नगरसेवक हरेश केणी, भाजप नेते निर्दोश केणी, कैलास घरत, विनेश कदम, हलोजी निघुकर, निलेश प्रधान, संजय कोळी, नाना प्रधान, भगवान पाटील, हरीचंद्र जाधव, कमळाकर पाटील, कैलास पाटील, संदीप दारावकर, प्रशांत दारावकर, प्रभाकर पाटील, संजय निघुकर, नवनीत निघूवर, बाळाराम पाटील, रूपेश प्रधान, विश्वनाथ पाटील, शिवाजी गोंधळी, रूपेश निघुकर, रमेश पाटील, बाळा धुमाळ, संभाजी गोंधळी, सुशांत कदम, रूपेश कांबळे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून नितेश पाटील यांच्या माध्यमातून घोट गावात ‘आय लव्ह घोट गाव’ हे सेल्फी पॉईंट उभारण्यात आले आहे. यामुळे घोट गावाच्या सौंदर्यात भर पडली असून याचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक हरेश केणी यांच्या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण झाले.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply