Breaking News

नवीन पनवेल येथे रंगली दिवाळी पहाट

पनवेल ः रामप्रहर वृत्त

दिवाळी निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. त्याअंतर्गत पनवेल महापालिकेचे नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ आणि उत्कर्ष सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळाच्यावतीने सोमवारी दिवाळी पहाट कार्यक्रमाचे नवीन पनवेल येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकुर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.  नवीन पनवेल येथे उत्कर्ष कला आणि क्रिडा मंडळ आणि पनवेल महापालिकेचे नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांच्यावतीने दिवाळी पहाटनिमित्त मराठी आणि हिंदी गीतांची सुरेल मैफिल आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, प्रभाग समिती क चे अध्यक्ष गोपिनाथ भगत, प्रभाग समिती ड चे अध्यक्ष तेजस कांडपिळे, नगरसेवक प्रकाश बिनेदार, मनोहर म्हात्रे, संतोष शेट्टी, नगरसेविका सुशिला घरत, दर्शना भोईर, कुसुम म्हात्रे, भाजपनेते जगदिश घरत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply