Breaking News

पनवेलच्या सीएला अडकविण्यासाठी सिनेमास्टाईलने केलेला प्रयत्न फसला

पनवेल : वार्ताहर

पनवेलच्या एका सनदी लेखापालाला बेकायदेशीर अग्निशस्त्र खरेदी करण्याच्या प्रकरणात अडविण्याचा सिनेमा स्टाईल प्रयत्न फसला. फसवणूक प्रकरणात सनदी लेखापालाने कार्यालयात 22 वर्षे काम करणार्‍या कर्मचार्‍याला लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकविल्याचा राग मनात धरून या वादग्रस्त कर्मचार्‍यानेच सनदी लेखापालाला अडकविण्याचा प्रयत्न केला. बेंगलोरमधील कब्बन पार्क पोलीस ठाण्यात दाखल या घटनेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सनदी लेखापाल भाविन गडीया यांच्या कार्यालयात बेंगलोर येथील कब्बन पार्क पोलीस ठाण्याचे पोलीस ताब्यात घेण्यासाठी आले. बेंगलोर येथे बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या राहुल नामक आरोपीने तुमचे नाव घेतल्यामुळे तुम्हाला चौकशीसाठी बेंगलोरला यावे लागेल असे पोलिसांचे म्हणणे होते. भाविन गडिया यांना पनवेल पोलिसांच्या संमतीने बेंगलोरला नेण्यात आले. भाविन गडीया यांच्या चौकशीत संबंधित आरोपीने गडीया यांना मुंबई वेळोवेळी मोबाईलवर मँसेज पाठविले असल्याचेही समोर आले. भाविन गडीया यांनीच मला दोन देशी बनावटीच्या पिस्तूल आणि चार जिवंत काडतूसे विकण्यासाठी बेंगलोरला पाठविल्याचे राहूलचे म्हणणे होते. राहूलची अधिक चौकशी केल्यानंतर भाविन गडिया यांच्या कार्यालयात काम करणार्‍या इरफान भोपाळी याच्या सांगण्यावरूनच भाविन यांना या प्रकरणात अडकविण्याचा डाव आखल्याची कबुली दिली.

कार्यालयात काम करीत असल्याचा गैरफायदा घेवून सेल्स टँक्स विभागाच्या अधिकार्‍यांना हाताशी धरून खोट्या नोटीस पाठवून गडीया यांच्या ग्राहकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न इरफानने केला होता. इरफान आणि सेल्स टँक्सच्या उच्चपदस्थ अधिकार्‍याला कोट्यवधीची रक्कम मागितल्याप्रकरणी लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. 22 वर्षे काम केलेल्या मालकानेच आपल्याला जेलमध्ये अडकवले याचा राग मनात धरून इरफानने भाविन गडीया यांना अडकविण्यासाठी हे सिनेमास्टाईल कुबाड रचल्याचे चौकशीत उघड झाले. मुंबईतून कब्बन पार्क परिसरात शस्त्रे घेवून जाताना वेळोवेळी मेसेज पाठवून कळविले होते. त्यामुळे पोलिस देखील चक्रावून गेले, परंतू त्यावर गडिया यांचा कोणताही प्रतिसाद नसल्यामुळे बेंगलोर पोलीसदेखील कोड्यात पडले होते.

तुमचे जुने कोणाशी वैर आहे का, तुमचे कोणाशी शत्रृत्व आहे का हा प्रश्न विचारल्यानंतर खोट्या नोटीस प्रकरणी इरफानवर केलेली कारवाई पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांना अटक आरोपीकडून ही कबुली मिळविण्यास यश आले.

मुख्य सूत्रधार जेलमधूनच ताब्यात

सेल्स टँक्स विभागाच्या खोट्या नोटीस प्रकरणातून जामिनावर सुटल्यानंतर इरफानने पनवेलमध्ये एका महिलेला घर घेण्याच्या बहाण्याने 60 लाखांची फसवणूक केली होती. या प्रकरणात तळोजा जेलमध्ये असतानाच बेंगलोर पोलिसांनी इरफानला ताब्यात घेतले होते. या प्रकरणात त्याचा मुख्य भूमिका असल्याचे उघड झाले.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply