केंद्रीय मंत्री भागवत कराड, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची भेट
पनवेल : रामप्रहर वृत्त
श्री संत वामनभाऊ व भगवानबाबा पुण्यतिथीनिमित्त खांदा कॉलनीत अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता. या सप्ताहाला शुक्रवारी (दि. 13) केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी भेट दिली. सप्ताहाची सांगता शनिवारी (दि. 14) ह.भ.प. सुदाम महाराज पानेगावकर यांनी काल्याच्या कीर्तनाने झाली. अखेरच्या दिवशी भाजपच्या राष्ट्रीय सचिव, माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी सप्ताहाला भेट दिली.
खांदा कॉलनीतील पोलीस ठाण्यासमोरील मैदानात 7 ते 14 जानेवारीदरम्यान हरिनाम सप्ताह रंगला. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम झाले. या सप्ताहाला शुक्रवारी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी भेट देत वंदन केले. या वेळी त्यांनी श्री संत वामनभाऊ, भगवानबाबा आणि स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या आशीर्वादामुळे मी जनतेची सेवा करीत आहे. जनतेसोबत असलेली नाळ तुटू देणार नाही, ग्वाही दिली. सप्ताहाला अखेरच्या दिवशी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भेट दिली व वंदन केले. आयोजकांच्या वतीने मान्यवरांचे स्वागत व सन्मान करण्यात आला.
या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, सरचिटणीस विक्रांत पाटील, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख रामदास शेवाळे, तहसीलदार विजय तळेकर, माजी उपमहापौर सीताताई पाटील, भाजप भटके विमुक्त आघाडी उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबन बारगजे, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, मंडळाचे अध्यक्ष हरिदास वणवे, उपाध्यक्ष सुनील खाडे, विनायक मुंडे, सचिव देविदास खेडकर, खजिनदार संजय वायभासे, उपसचिव दिलीप नाकाडे, दत्ता बिनवडे, उपखजिनदार शिवाजी लांब, बाळासाहेब बडे, विष्णू वायभासे, किसन लांडगे, सल्लागार सदानंद पाटील, कचरू डमाळे, रामदास नाकाडे, सतीश गरजे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.