Breaking News

पनवेलमधील वेश्यांवर कारवाई करण्याची मागणी

नगरसेविका दर्शना भोईर यांचे पोलिसांना निवेदन

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महानगरपालिका हद्दीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या बाजुच्या रस्त्यावर उभ्या असलेल्या वेश्यांवर तत्काळ कारवाई करा, अशी मागणी नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कादबाने यांना निवेदन दिले आहे.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर रोजबाजार, पटवर्धन हॉस्पीटल या दरम्यानच्या रस्त्यावर वेश्या उभ्या राहात असुन या ठिकाणी येणार्‍या महिलांना याचा नाहकपणे त्रास होत आहे. याच परिसरात गुजराती शाळा असुन विद्यार्थी व मुलींनाही याचा खुप त्रास होत आहे. पनवेल शहराच्या संस्कृतीचे या माध्यमातून विद्रुपीकरण होत आहे व तरुण पिढी चुकीच्या मार्गी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी यापूर्वीही आपल्याकडे या समस्येबाबत तक्रार केलेली असून या समस्येवर कोणतीही कारवाई केली गेलेली नाही. मी आपणास या विषयाबाबत यापुर्वी पत्रव्यवहार करूनही पोलीस विभागाकडून कोणतीही कारवाई झालेली नसुन अजुनही राजरोजसपणे या चुकीच्या गोष्टी चालू आहेत, असे नगरसेविका भोईर यांनी निवेदनात म्हटले आहे.

परीसरामध्ये आपल्या स्तरावर हा वेश्या व्यवसाय बंद करण्याबाबतची कार्यवाही करावी. जेणेकरून या परिसरातील नागरिकांना या समस्येपासून सुटका होईल. याबाबतची संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भोईर यांनी केली आहे.

निवेदन देतेवेळी नगरसेविका दर्शना भोईर यांच्यासमवेत गीता सचदेव, अंजली इनामदार, सोनाली कल्याणकर, मंजू देवडा, प्रिया म्हात्रे, कुसूम झगडे, महाजन, पटवर्धन हॉस्पिटलमधील स्टाफ, आदी उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply