मोहोपाडा : प्रतिनिधी
जलजीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याची टाकी बांधण्याचा व हातनोली गावातून अंतर्गत पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन टाकण्याच्या कामाचा भुमिपुजनाचा कार्यक्रम सरपंच रितू ठोंबरे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीरशेठ ठोंबरे व जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाला. हातनोली गावची लोकसंख्या जवळपास 2600 ते 2700 च्या आसपास आहे. या परिसरातील पाणी समस्या सुटावी यासाठी जिल्हा उपाध्यक्ष सुधीरशेठ ठोंबरे आणि जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे या दोघा बंधूनी प्रयत्नशील राहून हातनोलीकरांसाठी मोठे योगदान दिले आहे. हातनोली जलजीवन पाणीपुरवठा योजनेचा भूमीपूजन शुक्रवारी करण्यात आला. यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष मनोहर देशमुख, ग्रामपंचायत सदस्या स्वाती देशमुख, शरद पिंगळे, प्रदिप गोंधळी, वसंत नलावडे, संतोष देशमुख, कुमार ठोंबरे, जयसिंग देशमुख, विनोद ठोंबरे आदीसह हातनोळीकरांसह आदीवासी बांधव उपस्थित होते. हातनोलीतील पाण्याची समस्या मार्गी लागणार असल्याने ग्रामस्थांनी सरपंच रितू ठोंबरे, जिल्हा उपाध्यक्ष सुधीरशेठ ठोंबरे व जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे यांचे आभार मानले.