हरिदास बाणकोटकर यांची पत्रकार परिषदेत मागणी
मुरुड : प्रतिनिधी
राजपुरी कोळीवाडा येथील सात घरे अनधिकृत असून ती पाडण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी मी मुरुड तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसलो होतो. त्यावेळी राजपुरी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका झिराडकर मॅडम व गट विकास अधिकारी सुद्धा उपस्थित होते. यावेळी मला ग्रामपंचायतीकडून लेखी आश्वासन देण्यात आले होते कि, डिसेम्बर 2022 पर्यंत जागेची मोजणी करून तद्नंतर जागेची तपासणी करून ती अनधिकृत घरे पाडण्यात येतील.असे लिखित आश्वासन देऊन आपण उपोषणास बसू नये अशी विनंती केल्यामुळे हरिदास बाणकोटकर यांनी आपले उपोषण समाप्त केले होते.
आज 15 ऑगस्ट संपून एवढे महिने वाया गेले तरी जागेची मोजणीचा झाली नाही ना अनधिकृत घरे पाडण्याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. राजपुरी ग्रामसेविका यांनी मला आश्वासन दिले म्हणून मी उपोषणास बसलो नाही. माझी फसवणूक करणार्या ग्रामसेवक यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी हरिदास बाणकोटकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे. यावेळी त्यांच्या पत्नी गीता बाणकोटकर उपस्थित होत्या.
या बाबत अधिक माहिती सांगताना हरिदास बाणकोटकर यांनी सांगितले कि, तहसीलदार मुरुड सांगतात हि सर्व जबाबदारी राजपुरी ग्रामपंचायतीची आहे.तुम्ही तिथेच संपर्क साधावा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी राजपुरी ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा करीत असून आज एवढे महिने निघून गेले तरी कोणतीही कार्यवाही होत नाही. ज्यांनी मला लिखित आश्वसन दिले त्यांनीच या कामाची पूर्तता करणे आवश्यक असताना मला मुरुड पोलीस निरीक्षक सुद्धा मदत करीत नसल्याची नाराजी व्यक्त केली आहे.
- उपोषणाचा इशारा
राजपुरी कोळीवाडा येथील अनधिकृत घरे तोडली नाहीत अथवा कोणतीही कार्यवाही झाली नाही तर मी माझ्या कुटुंबासोबत जिल्हाधिकारी रायगड यांच्या कार्यालयासमोर लवकरच उपोषण करणार असल्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे.