Breaking News

महिला शेतकरी दिनानिमित्त गोळेगणी येथे महिलांचा सत्कार

पोलादपूर : प्रतिनिधी

कृषीक्षेत्रामध्ये महिलांचे बहुमोल योगदान असल्याने महिला शेतकरी दिनानिमित्त त्यांचा गौरव होणे उचित असल्याचे मत महाड उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे यांनी पोलादपूर तालुक्यातील गोळेगणी येथे व्यक्त केले.

महिला शेतकरी दिनानिमित्त गोळेगणी येथे महिला शेतकर्‍यांचा हृद्य सत्कार करण्यात आला, त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात बालाजी ताटे बोलत होते. या वेळी कृषीपूरक आणि बचतगट माध्यमातून उल्लेखनीय काम केल्याबद्दल प्रांजली पवार, जान्हवी मोरे, उषा मोरे, रेखा येरूणकर, उषा येरूणकर, आश्विनी येरूणकर आणि पूजा मोरे यांचा कृषी कन्या म्हणून गौरव करण्यात आला.

कृषी सहायक मनोज जाधव यांनी प्रास्ताविक केले.  तालुका कृषी अधिकारी सूरज पाटील यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया लघुउद्योग योजनेचा लाभ शेतकर्‍यांनी घेण्याचे आवाहन केले. सरपंच नितीन मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन दरेकर यांनी केले. आत्माचे कपिल पाटील, माजी सरपंच प्रभाकर पवार, तसेच अनिल डासाळकर, महेश कदम, प्रसाद भोकरे, अंजूम मोमीन, कृषीमित्र नामदेव येरूणकर, रोजगारसेवक शेखर येरूणकर, प्रगतशील शेतकरी ज्ञानेश्वर मोरे, सुरेशराव मोरे व प्रकाश मोरे आदी या वेळी उपस्थित होते. कृषी पर्यवेक्षक श्रीरंग मोरे यांनी आभार मानले. त्यानंतर बहुपिक पध्दतीने शेती करणारे ज्ञानेश्वर मोरे, दीपक मोरे, अनिकेत मोरे, सागर मोरे, सुरेशराव मोरे यांचा त्यांच्या शेतामध्ये जाऊन सत्कार करण्यात आला.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply