Breaking News

देवदर्शनहून परतताना कुटुंबावर काळाचा घात

अज्ञात वाहनाला दिलेल्या धडकेत एक ठार; तिघे जखमी
खालापूर ः प्रतिनिधी
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मुंबई लेनवर माडप बोगदा परिसरात किमी 22जवळ कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने समोर असणार्‍या अज्ञात वाहनाला मागून धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून कारमधील तिघे जण जखमी झाले आहेत. जखमींना एमजीएम रुग्णालय कळंबोली येथे दाखल करण्यात आले आहेत. भिवंडी-ठाणे येथील कुटुंब कोल्हापूर दर्शन करून येथे परतीचा प्रवास करताना सोमवारी (दि. 15) पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. भिवंडी-ठाणे येथील साहू कुटुंब कोल्हापूर येथून देवदर्शन करून परतीच्या प्रवासाला निघाले होते. अतिवेगाने जात असताना सोमवारी पहाटेच्या वेळी कारचालक अभिषेक मुनीलाल साहू (वय 37) याचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार पुढे असणार्‍या वाहनाला धडकली. या अपघातात कारमधील मुनीलाल साहू (वय 68) यांचा जागीच मृत्यू झाला, तर चालक अभिषेक मुनीलाल साहू याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याचप्रमाणे शांतीलाल साहू (वय 60), लक्ष्मीकुमारी अभिषेक साहू (वय 33) हे गंभीर जखमींची नावे असून त्रिशा साहू (वय 5) व दर्शिल साहू (वय 2) या लहान मुलांना सुदैवाने कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही. एअरबॅग ओपन होऊन ही चालक गंभीर जखमी झाला असून एक जण जागीच ठार झाला असल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दोन दिवसांपूर्वी हाळ गावाच्या हद्दीत घडलेल्या कार अपघातात संजय जाधव हा चालक एअरबॅग ओपन होऊनही ठार झाला होता. एका तज्ज्ञाने याबाबत माहिती दिली की, अपघातग्रस्त वाहनामधील प्रवाशांनी सिटबेल्ट लावला असेल तर 320 किमी वेगाने म्हणजेच दोन मिली सेकंदात एअरबॅग ओपन होऊन चालकाचे स्टेअरींगवर डोके आदळण्यापूर्वी एअरबॅग ओपन होते. यासाठी सिटबेल्ट म्हणजेच सेफ्टीबेल्ट वाहनातील प्रवाशांनी लावणे आवश्यक असते.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply