पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग समिती अ-मधील पेंधर गावात पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून गटार बांधण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आणि महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत रविवारी (दि. 14) झाले.
पेंधर येथील प्रकाश कान्हा पाटील यांच्या घरापासून ते नाल्याच्या पुलापर्यंत गटार बांधण्यात येत आहे. या कामासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून एक कोटी 62 लाख 28 हजार 86 रुपये मंजूर झाले आहेत. या कामामुळे तेथे पावसाळी पाण्याचा निचरा होण्यास मदत होणार आहे.
या कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमास संतोष भोईर, विकास म्हात्रे, संतोष केणी, अविनाश म्हात्रे, हरेश केणी, सचिन पाटील, संदीप पाटील यांच्यासह भाजप, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
Check Also
सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक
प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …