आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजप सर्वत्र वाढत, विस्तारत असून पनवेल तालुक्यातील आदई येथे सुरू करण्यात आलेल्या पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 4) करण्यात आले.
नागरिकांना भेडसावणार्या समस्या भाजपच्या माध्यमातून सोडविण्याच्या दृष्टिकोनातून जगदीश शेळके यांनी पक्षाचे जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे. या कार्यालयाच्या उद्घाटन समारंभास माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, माजी पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, माजी सरपंच महादू शेळके,
युवा नेते जगदीश शेळके, अनंताबुवा पाटील, धर्माशेठ काकडे, भाई पाटील, जनार्दन पाटील, मंगेश भोपी, निलेश पाटील, राहुल पाटील, राजेश काकडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागिरकांच्या समस्या सुटतील, असा विश्वास व्यक्त केला.