Breaking News

खारघरच्या तरुणांनी साकारली सिंहगडाची प्रतिकृती

खारघर ः प्रतिनिधी

महाराष्ट्राचा मराठमोळा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांची थोरवी, संस्कृती व परंपरेची आठवण किल्ल्यांच्या साक्षीने जागृत करावी, तसेच किल्ले बनवून त्याप्रति आपली आत्मीयता प्रकट करणे व आपले दिवाळीतील लहानपण जागे करण्याच्या हेतूने खारघरमधील युवकांनी एकत्र येऊन सचिन तेंडुलकर मैदान सेक्टर 21 या ठिकाणी सिंहगड किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती तयार केली आहे.

आजच्या मोबाइल युगात व आधुनिकीकरणामुळे तरुण पिढी व बच्चेकंपनी भारतीय संस्कृती, परंपरा व इतिहास विसरू पाहत आहे. किल्ले बनविणे ही आपल्या महाराष्ट्राची जुनी परंपरा आहे. हे किल्ले म्हणजे राजे-महाराजांनी केलेल्या पराक्रमाचे साक्षीदार आहेत.

ज्याचे किल्ले त्याचे राज्य ह्या संकल्पनेतून धर्माचे रक्षण आपल्या महाराजांनी केले.     किल्ल्यांचे संगोपन, संवर्धन व त्याचे महत्त्व नागरिकांना समजावे ह्याच ध्येयाने दीपावलीच्या निमित्ताने जनजागृती करण्यात येत आहे. अर्जुन घाटगे, चैतन्य झांजले, राकेश थोरात, ओंकार भोसले, साहिल वारंग, ऋषी कांबळे, अभी कांबळे, हर्षद भोसले आणि मित्र परिवार खारघर यांनी या उपक्रमासाठी विशेष मेहनत घेतली. त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply