खारघर : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर रामशेठ ठाकूर वाणिज्य शास्त्र महाविद्यालयात सोमवारी (दि. 5) स्टाफ वेल्फेअर कमिटी व नेचर्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिन व नो वेहिकल डे साजरा करण्यात आला. महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी दोन चाकी व चार चाकी गाड्या महाविद्यालयामध्ये न आणता प्रदूषण करणे टाळले व पर्यावरणाचे संतुलन राखले पाहिजे हा मोलाचा संदेश इतर नागरिकांना दिला. प्राचार्य डॉ. रूपेंद्र गायकवाड यांनी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले. या वेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी तसेच प्रा. महेश्वरी झिरपे (समन्वयक अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्ष) हे सर्व उपस्थित होते. या पर्यावरण दिनाचे आयोजन प्रा. डॉ. धनवी आवटे यांनी केले तसेच प्रा. सफीना मुकादम, डॉ. फारुख शेख व प्रा. प्रथमेश उदेकर यांनी सहकार्य केले.