माणगाव : प्रतिनिधी
माणगाव तालुक्यातील भाले गावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 4) सायंकाळी आमदार भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. माणगाव शासकीय विश्रामगृहात रविवारी संध्याकाळी झालेल्या कार्यक्रमात भाले गावचे ज्येष्ठ नेते भागाराम मंचेकर, पंढरीनाथ उतेकर यांच्या नेतृत्वाखाली चंद्रकांत मंचेकर, विनोद ढवळे, महेश महाडिक, राकेश महाडिक, संजय चव्हाण, गणेश महाडिक, निलेश मेढेकर, संतोष खांबे, अर्जुन धाडवे, अनील धाडवे, नितीन मेढेकर, विलास महाडिक, नरेश महाडिक, नथुराम कदम, अनिकेत बोडेरे, प्रणव मंचेकर, सुंदर महाडिक, संदेश मंचेकर, उमेश जाधव, सचिन शिंदे, संदीप शिंदे, आदेश धाडवे, जयंद्र मेढेकर, रमेश मेढेकर, प्रथमेश महाडिक, जयंद्र मांडवकर, सतिष मंचेकर, विजय मंचेकर, अक्षय मंचेकर, महेंद्र मंचेकर, नितेश खांबे, दिनेश खांबे, जयेश मंचेकर, संतोष महाडिक, आकाश माळी, अशिष माळी, विजय माळी, महेश माळी, नितीन माळी, रजत माळी, रोशन पवार, रुपेश पवार, अजय कुपले, गणेश मंचेकर, कुमार शेळके, पुनीत खांबे, प्रज्वलित खांबे आदी ग्रामस्थांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. भाले गाव ये झांकी है, निजामपूर विभाग अभी बाकी है, असा इशारा शिवसेना (शिंदे गट) जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसला दिला. विपुल उभारे, गणेश पवार, अविनाश नलावडे, दाखणे ग्रामपंचायतीचे सरपंच विश्वास उभारे, नितीन पवार, राजेश कदम, संजय गुळंबे, मनोज सावंत, मेहुल उभारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.