महाड : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांचा 350वा शिवराज्याभिषेक सोहळा 2 जून रोजी तिथीप्रमाणे साजरा करण्यात आलेल्या मंगळवारी (दि. 6) तारखेनुसार हा सोहळा होणार आहे. या सोहळ्याची तयारी प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने केली आहे.
शिवरायांचे तेरावे वंशज संभाजीराजे यांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा होणार आहे. दरवर्षी या सोहळ्यासाठी रायगडावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. या वेळी शिवप्रेमींची गैरसोय होऊ नये म्हणून विशेष दक्षता घेण्यात येत आहे.
दरम्यान, शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान 2 जून रोजी ओमकार दीपक भिसे (वय 19, रा. संकेश्वर ता. हुकेरी जि. बेळगाव) आणि 4 जूनला प्रशांत गुंड (वय 28, रा. पुणे यांचा मृत्यू झाला. या घटनांची चौकशी करण्यासाठी रायगडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष डॉ. योगेश म्हसे यांनी महाड उपविभागीय दंडाधिकारी यांची एकसदस्यीय समिती गठीत केली आहे. त्याचप्रमाणे चौकशी अहवाल तातडीने 15 दिवसांत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
Check Also
कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …