Breaking News

ऑनलाईन धर्मांतरणप्रकरणी आरोपीला अलिबागेतून अटक

अलिबाग ः प्रतिनिधी
ठाण्यातील मुंब्य्रात झालेल्या ऑनलाईन धर्मांतरणप्रकरणी शाहनवाज मकसुद खान या मुख्य आरोपीला अलिबागच्या मांडवी मोहल्ला येथून अटक केली. मुंब्रा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील धर्म परिवर्तन प्रतिषेध अधिनियम 2021 कलम 3,5(1) या गुन्ह्यातील फरारी आरोपी शहानवाज उर्फ शानु मकसुद खान (वय 23, रा. मुंब्रा, जि. ठाणे) याचा शोध सुरू होता. त्याला मुंब्रा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कुंभार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अलिबाग पोलिसांच्या मदतीने ए बी कॉटेज, मांडवी मोहल्ला ताब्यात घेतले. आरोपीला पुढील चौकशीसाठी मुंब्रा पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.
हिंदू धर्मीय मुलांचे ऑनलाइन गेमद्वारे धर्मांतर होत असल्याची नोटीस उत्तर प्रदेशातील गाझियाबाद पोलिसांनी बजावली होती. या प्रकरणाचे मुंब्रा कनेक्शन समोर आले. यातील मुख्य आरोपी शाहनवाज खान हा आपल्या कुटुंबीयांसोबत मुंब्रा येथील देवरी पाडा परिसरात रहाणार असल्याची माहिती गाझियाबाद पोलिसांना मिळाली. या माहितीनुसार उत्तर प्रदेश एसटीएफचे पथक आरोपीच्या शोधासाठी मुंब्र्यात दाखल झाले होते, मात्र तो कुटुंबीयांसह तेथून फरार असल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणाच्या तपासात उत्तर प्रदेश पोलिसांनी गाझियाबाद येथून अब्दुल रहमान उर्फ नन्नी पुत्र महमूद अन्सारी या आरोपीला अटक केली. या आरोपीने मुंब्रा भागात शाहनवाज मकसूद खान हा बनावट युजर आयडी बनवून त्याच्या माध्यमातून तो गेम खेळण्यासाठी उपलब्ध करून देत होता. या गेममध्ये हरलेल्या हिंदू मुलांना तो कलमा वाचायला सांगून इस्लाम कबूल करण्यास भाग पडत होता. त्यांना कलमा वाचल्यानंतर तुम्ही कधीही गेम हरणार नसल्याचे आमिष दाखवत होता.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply