मॅनचेस्टर : वृत्तसंस्था
भारत आणि पाकिस्तान सामना म्हटलं की प्रेक्षकांच्या अंगात वेगळाच उत्साह संचारतो. त्यात विश्वचषकातील सामना असेल, तर चाहत्यांना युद्धज्वर चढतो. भारत आणि पाकिस्तानातील चाहते नखं कुरतडत हा सामना पाहत असताना, एक माणूस काहीसा निर्धास्त दिसला. तो म्हणजे खुद्द पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद.
सामना सुरू असतानाच चक्क सरफराज भर स्टेडियमवरच जांभया देताना दिसला. कॅमेराच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. नाणेफेक जिंकून पाकिस्तानने भारताला प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिलं. रोहित आणि राहुलच्या जोडीने दणक्यात सुरुवात करून दिली. खरं तर भारताची ही सुरुवात पाकची झोप उडवणारी होती. मात्र सरफराजला झोप आल्यामुळे पाकिस्तानी चाहतेही भडकले. कोणी सरफराजला ’स्लीप फील्डर’ म्हणून डिवचलं, तर कोणी सरफराजने आशा सोडून दिल्याचं म्हटलं.