Breaking News

नवी मुंबईकरांसाठी 24 तास उपलब्ध राहणार -आयुक्त अभिजीत बांगर

नवी मुंबई : बातमीदार  – नागरिकांमदमध्ये निर्माण झालेले गैरसमज दूर करण्यासठी प्रशासन कटिबद्ध आहे. कार्यक्षमतेत वकार्यपूर्ततेत कसलीही हयगय केली जाणार नाही. नवी मुंबईचा मृत्युदर कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असून यापूढे माझ्यासह सर्वच अधिकारी नवी मुंबईकरांसाठी 24 तास उपलब्ध असतील याची ग्वाही नवनियुक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.

मंगळवारी आयुक्त बांगर यांनी नवी मुंबई महापालिकेचा पदभार स्वीकारला. कोविडबाबत यापुढे पालिकेची रणनीतीची काय असणार? याची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परीषदेत आयुक्त बोलत होते.

सध्या मुंबई व ठाण्यापेक्षा नवी मुंबईचा टेस्टचा दार कमी आहे. टेस्टिंगचा वेग वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असून त्यासाठी खासगी लॅबसोबत आणखीन सरकारी लॅबसोबत संलग्नता वाढवणार आहोत. त्यासोबत पालिकेची लॅब देखील सुरू होणे गरजेचे असून त्याकडे विशेष लक्ष देणार असून, मनुष्यबळ वाढवण्यावर भर असणार आहे.  पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील लक्षणे असोत व नसोत त्यांचीही टेस्ट केली जाणार असल्याचे तसेच कॉन्टॅक्त स्ट्रेस्टिंग वाढवणार असल्याचे बांगर यांनी सांगितले. 

यासोबत अँटिजेन टेस्ट नवी मुंबईत केल्या जाणार असून; अहवाल लवकर येऊन व पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची साखळी वेळीच तोडण्यात यश येणार आहे. कंटेन्मेंट झोन, होटस्पॉट केंद्राच्या ठिकाणी याचा वापर करून मग इतर उभागात या टेस्ट केल्या जातील. तसेच यापुढे कोविड केअर सेंटर, कोविड केअर हेल्थ सेंटर व कोविड रुग्णालयातील साफसफाई व अन्न व्यवस्थेवर काटेकोर लक्ष ठेवण्यात येईल. यासोबत बेड उपलब्धता, ऑक्सिजन बेड, आयसीयू व व्हेंटिलेटर्स उपलब्धता वाढवणार असून कोविड केअर सेंटर ते कोविड हॉस्पिटलचा आढावा घेऊन उणिवा शोधल्या आहेत. त्याव्यतिरिक्त नॉनकोविड सुविधा देखील योग्यरित्या नागरिकांना पुरवल्या जातील. पोलिसांशी समन्वय साधून यापूढे लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाईल. लॉकडाऊन वाढवायचा की नाही हे परिस्थितीवर अवलंबून असणार आहे.

यापूढे बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही असा सज्जड दम देखील त्यांनी पालिका अधिकार्‍यांना व नागरीकांना दिला.  आरोग्य विभागातमेडिकल, पॅरामेडिकल व वर्ग चार या तिन्ही प्रकारात मनुष्यबळ वाढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. जर  लोकप्रतिनिधीची इच्छा असल्यास ते पालिकेसोबत काम करू शकतात. एपीएमसीबाबत योग्य तो निर्णय तेथील संचालक व प्रशासनकांशी बोलून घेतला जाईल, असेही आयुक्त बांगर म्हणाले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply