सुधागड : रामप्रहर वृत्त
हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगडावर 1 जून ते 6 जून या कालावधीत 350वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. या वेळी मोठ्या संख्येने लोक आल्याने कचर्याचे साम्राज्य झाले होते. स्वयंसेवी संस्था व दुर्गप्रेमींनी रायगडावर स्वच्छता मोहीम राबवून किल्ला स्वच्छ केला.
सुरभी स्वयंसेवी संस्था अलिबाग, रायगड रक्षित सामाजिक संस्था म्हसळा, अनुभव प्रतिष्ठान खोपोली, महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्ट पेण, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून एनएसएसचे विद्यार्थी आदी संस्थांच्या प्रतिनिधी व स्वयंसेवक यांच्यामार्फत रायगड किल्ला परिसरातील नाणे दरवाजा, चित्त दरवाजा, माथा ते पाचाड पायथा येथील साफसफाई करण्यात आली.
पाण्याच्या बाटल्या, ओआरएस पावडरचे पॉकेट्स, आयोजन करणार्या सर्व यंत्रणांच्या सेवकांना जेवण, नाश्ता, चहापाणी यांच्या पडलेल्या प्लेट, मोबाईल टॉयलेट शौचालयामधून येणारी दुर्गंधी, इतरत्र केलेली लघुशंका यामुळे रायगडचा परिसर खराब झाला होता, परंतु शिवरायांसाठी काय पण हीच भावना ठेवून स्वयंसेवक व दुर्गप्रेमींनी भरउन्हात गड स्वच्छ केला.
Check Also
शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित
पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …