Breaking News

उरणमध्ये विविध पक्षांच्या सरपंच, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

उरण ः प्रतिनिधी, वार्ताहर
उरण भाजपच्या वतीने शनिवारी (दि. 10) जेएनपीए बंदर वसाहतीच्या बहुउद्देशीय सभागृहात कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी बोलताना भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी, उरण विधानसभा मतदारसंघाचा खराखुरा विकास करण्याचे काम या मतदारसंघाचे नेतृत्व करणारे आमदार महेश बालदी यांनी केले आहे. त्यामुळे आज त्यांच्यावर विश्वास ठेवून अनेक गावांतील विविध पक्षांचे आजी माजी सरपंच, पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. भाजपचा जिल्हाध्यक्ष म्हणून मला ही अभिमानाची बाब असून तळागाळातील लोकांशी नाळ जोडलेला नेता म्हणून महेश बालदी यांच्याकडे उरणची जनता बघत आहे, असे प्रतिपादन केले.
या वेळी भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण तालुकाध्यक्ष रविशेठ भोईर, खालापूर तालुका अध्यक्ष रामदास ठोंबरे, जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत घरत, विनोद साबळे, श्रीनंद पटवर्धन मिलिंद तावडे, कामगार संघटना जिल्हाध्यक्ष जितेंद्र घरत, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष निळकंठ घरत, भाजप उरण शहराध्यक्ष कौशिक शाह, माजी उपनगराध्यक्ष जयविन कोळी, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष राणी म्हात्रे, शहर अध्यक्ष संपूर्णा थळी, माजी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, ज्ञानेश्वर घरत, तालुका सरचिटणीस सुनील पाटील, मुकुंद गावंड, कुलदीप नाईक, प्रकाश ठाकूर, अजित पाटील केळवणे जि. प. विभागीय अध्यक्ष मंगेश वाकडीकर, सामाजिक कार्यकर्ते दिनेश तांडेल, संगीता पाटील, निर्मला घरत, जान्हवी पंडित, हितेश शाह, हस्तीमल मेहता, मनोहर सहतीया, हेमंत म्हात्रे, समीर मढवी, शशिकांत पाटील, शेखर तांडेल यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार प्रशांत ठाकूर पुढे म्हणाले की, उरण मतदारसंघात माजी आमदार मनोहर भोईर यांचे नेतृत्व डबघाईस आले आहे. आज या मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाची अवस्था बिकट झाली आहे, तर शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांनी 529 कोटींचा घोटाळा केला आहे.त्यामुळे जनतेचा विश्वासघात करणारे व जनतेचे पैसे बुडविणारे विवेक पाटील जेलची हवा खात आहेत. केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे. अशा सरकारच्या माध्यमातून या मतदारसंघाचा विकास आमदार महेश बालदी यांच्या संकल्पनेतून होत आहे. त्यांनी अंधारात चाचपडत पडलेल्या घारापुरी बेटावर लाईट आणण्याचे काम कोणत्याही प्रकारचे पद नसताना या अगोदर केले आहे. यापुढेही सर्वांगीण झाल्याशिवाय ते राहणार नाहीत.
भाजपमध्ये प्रवेश करणार्‍यांचे स्वागत करताना आमदार महेश बालदी म्हणाले की, उरण मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचे भाग्य मला लोकसेवक म्हणून लाभले आहे. या भागातील गरजवंतांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मी पुढाकार घेतला आहे. उरणमधील रेल्वेस्थानकांच्या नामकरणासाठी गावकर्‍यांच्या पाठिशी उभा राहणार आहे. ठाकरे सरकार गेले. आता खर्‍या अर्थाने भाजप-शिवसेना युतीचे सरकार आले आहे. त्यामुळे या मतदारसंघात यापुढे निधीची कमतरता भासू देणार नाही. कार्यकर्त्यांच्या विश्वासामुळे आणि मी केलेल्या विकासकामांच्या जोरावर या मतदारसंघातून पुन्हा निवडून येणार आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी माजी आमदार मनोहर भोईर यांच्या गावात जे वक्तव्य केले ते खोडसाळ होते. महाविकास आघाडीने वाटोळे केले. त्यामुळे 2024मध्ये जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप निवडून येणार आहे.
या वेळी इंद्रायणी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै.सुरेश राऊत यांचे सुपुत्र तथा कळंबुसरे गावचे माजी सरपंच सुशिल राऊत व सहकारी, धुतूम गावचे माजी सरपंच तथा शेकापचे ज्येष्ठ नेते धनाजी ठाकूर, अ‍ॅड. किशोर ठाकूर व इतर, नांदगावच्या सरपंच विजेता मनोहर भोईर, माजी सरपंच मनोहर भोईर व अन्य, खालापूर पंचायत समिती सदस्य कमळा भस्मा, दिघोडे, बोकडविरा गावातील कार्यकर्ते तसेच आजी माजी सरपंच, उपसरपंच सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply