Breaking News

रायगडाच्या पायथ्याशी दरड कोसळून दुकान, वाहनांचे नुकसान

सुदैवाने पर्यटक बचावले

महाड : प्रतिनिधी
रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या चित्त दरवाजामध्ये मंगळवारी (दि. 13) दुपारी तीनच्या सुमारास दरड कोसळून किल्ल्यावर गेलेल्या पर्यटकांच्या तीन वाहनांचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे येथे व्यवसाय करणार्‍या व्यावसायिकाच्या दुकानाचेदेखील नुकसान झाले. वाहनांमधील पर्यटक किल्ल्यावर गेले असल्याने सुदैवाने ते बचावले.
पावसानंतर रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या चित्त दरवाजामध्ये दरड कोसळून ती तेथे उभे असलेल्या वाहनांवर आली. या ठिकाणी लिंबू सरबतचा व्यवसाय करणार्‍या अमर सावंत यांच्या दुकानावरदेखील दगड आल्याने दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे.
रायगडावर 6 जूनच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. तत्पूर्वी या सोहळ्यासाठी आलेला एक तरुण गडावर आलेल्या दरडीमध्ये सापडून मृत्युमुखी पडला होता. ही घटना ताजी असतानाच गडाच्या पायथ्याशी अशीच दरड आल्याने भीती व्यक्त केली जात आहे. उंच कड्याचे दगड उन्हामध्ये तापल्यानंतर पडलेल्या पावसात तत्काळ सुटून खाली येतात, असे येथील स्थानिक ग्रामस्थ अमर सावंत यांनी सांगितले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply