Breaking News

माणगावजळ अपघातात तिघांचा मृत्यू

माणगाव : प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावर माणगावच्या इंदापूरजवळ शुक्रवारी (दि. 7) सकाळी 6.30च्या सुमारास मारुती इस्टीलो कार आणि आयशर टेम्पोमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात मुंबईच्या बोरीवली येथील तावडे कुटुंबातील आजीसह दोन नातवांचा जागीच मृत्यू झाला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुनील ट्रान्सपोर्टचा आयशर टेम्पो (जीए 03 के 5990) म्हापसे (गोवा) येथून मुंबईकडे जात होता. हा टेम्पो शुक्रवारी सकाळी 6.30च्या सुमारास इंदापूरजवळ आला असता मुंबईहून तळकोकणातील देवगडला जाणारी मारुती इस्टीलो कार (एमएच 02 सीडी 2667) भरधाव वेगाने झोका घेत अचानक चुकीच्या दिशेला येऊन ट्रकला धडकली. या अपघातात वैशाली विजय तावडे (वय 72), रिवान दर्शन तावडे (वय तीन) व रित्या दर्शन तावडे (वय सहा महिने) यांचा जागीच मृत्यू झाला, तर दर्शन तावडे व श्वेता दर्शन तावडे (वय 30) यांना दुखापत झाली असून दोन्ही गाड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

Check Also

नमो चषक स्पर्धेला लोकनेते रामशेठ ठाकूर क्रीडा नगरीत शानदार सुरुवात

पनवेल : रामप्रहर वृत्तशिवाजी पार्क व आझाद मैदान हे राज्याच्या दृष्टिकोनातून मुंबईतील अत्यंत महत्त्वाची अशी …

Leave a Reply