Breaking News

ऑईल टँकर पेटून तीन जणांचा होरपळून मृत्यू, तिघे जखमी

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दुर्घटना

खोपोली : प्रतिनिधी
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात एका ऑइल वाहतूक करणाार्‍या टँकरचा मंगळवारी (दि. 13) अपघात होऊन भीषण आग लागली. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून अन्य तिघे जखमी झाले आहेत. जखमींवर खंड्याळ्यातील खासगी रुग्णालयात व पवना येथील ट्रामा केअर येथे उपचार सुरू आहेत.
एक्स्प्रेस वेववरून जाणार्‍या टँकरचा खंडाळा हद्दीत कोडगाव ब्रिजवर अपघात होऊन आग लागली. ही आग इतकी भीषण होती की तिच्या झळांमुळे ब्रिजखालील दोन वाहनांनीही पेट घेतला. जुन्या मुंबई-पुणे मार्गावरील ज्या दोन गाड्यांना आग लागली त्यापैकी एका गाडीत महिला बसली होती. अचानक गाडीला आग लागल्याने तिला बाहेर पडता आले नाही. त्यामुळे ती होरपळली.
जवळपास तीन तासानंतरही आग धुमसत होती. आग विझविण्यासाठी द्रुतगती मार्गावरील सर्व आपत्कालीन यंत्रणा, खोपोली परिसरातील कंपन्यांचे अग्निशमन दल, खोपोली पालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न केले. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र या अपघातामुळे दोन्ही मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. वाहतूक सामान्य करण्यासाठी वाहतूक पोलीस, देवदूत टीम व अन्य आपत्कालीन यंत्रणा कार्यरत होत्या.

Check Also

राज्यस्तरीय 11व्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन

विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ …

Leave a Reply