Breaking News

चांद्रयान-2 आज अवकाशात झेपावणार…!

श्रीहरिकोटा : वृत्तसंस्था

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) चांद्रयान-2 मोहिमेच्या प्रक्षेपणाची सर्व तयारी पूर्ण केली असून, सोमवारी (दि. 22) दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी या यानाचे प्रक्षेपण होणार आहे. यापूर्वी चांद्रयान-2च्या प्रक्षेपणाची तारीख 15 जुलै रोजी निश्चित करण्यात आली होती, मात्र काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने शेवटच्या क्षणी या यानाचे प्रक्षेपण थांबवण्यात आले होते. ‘इस्रो’चे प्रमुख डॉ. सिवन यांनी सांगितले की, चांद्रयान-2च्या प्रक्षेपणात आलेल्या तांत्रिक अडचणी आता दूर करण्यात आल्या आहेत. गेल्या शनिवारी इस्रोने चांद्रयान-2च्या प्रक्षेपणासाठीचे यान जीएसएलव्ही मार्क 3एम1ची तालिमही पूर्ण केली आहे. या वेळी त्याच्या कामगिरीत कुठलीच अडचण आढळून आली नाही. त्यामुळे चांद्रयान-2चे प्रक्षेपण सोमवारी होईल.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply