आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 2 कोटी 80 लाखांच्या निधीतून रस्त्यांचा विकास
पनवेल : रामप्रहर वृत्त
विकासाच्या कामांसाठी पुढाकार महत्त्वाचा असतो, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 13) केले. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा पनवेल मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या दोन कोटी 80 लाख रुपयांच्या स्थानिक ग्रामविकास निधीतून तालुक्यातील वाकडी ते दुंदरेपर्यंतच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण आणि डांबरीकरण करण्यात येणार आहे. या कामांचा शुभारंभ लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्या वेळी ते बोलत होते.
पनवेल विधानसभा मतदाससंघात भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली अनेक विकासकामांना गती प्राप्त झाली आहे. त्यांच्या सातत्यापूर्ण पाठपुराव्यामुळे वाकडी ते दुंदरेपर्यंतच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण आणि डांबरीकरण करण्यास सुरुवात झाली आहे. त्यांच्या दोन कोटी 80 लाख रुपयांच्या स्थानिक ग्रामविकास निधीमधून रस्त्यांचे काम करण्यात येणार आहे. यामध्ये चिंचवली ते दुंदरेपाडापर्यंतच्या रस्त्याचे दोन कोटी 30 लाख रुपये निधीमधून डांबरीकरण आणि दुंदरे गाव ते तामसाई फाटापर्यंतच्या रस्त्याचे 50 लाख रुपये निधीमधून काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. या कामांचे भूमिपूजन लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले.
या विकासकामांच्या शुभारंभावेळी भाजप विधानसभा निवडणूक प्रमुख तथा जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस भूपेंद्र पाटील, माजी उपसरपंच रमेश पाटील, नेरे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष सुनील पाटील, नितीन पाटील, दुंदरेच्या सरपंच अनुराधा वाघमारे, उपसरपंच किशोर पाटील, माजी सरपंच नामदेव जमदाडे, अमोघ प्रशांत ठाकूर, शांताराम चौधरी, गुरूनाथ भोपी, वासुदेव भोपी, कृष्णा पाटील, विष्णू भगत, नवनाथ भोपी, नितीन काठवले, पोलीस पाटील दीपक पाटील, नारायण मढवी, नरेश वास्कर, नरेश चौधरी, गणेश उसाटकर, हरीशेठ पाटील, रामदास शेळके, दयेश जांभळे, सुनील शेळके, रूपेश पाटील, भागेश शेळके, सीताराम पाटील, बाळाराम गोंधळी, जाना शेळके, प्रकाश शेळके, विठ्ठल शेळके, नारायण शेळके यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.