Breaking News

जय श्रीराम घोषणेला विरोध करणार्‍या शाळेला भाजपचा दणका

पदाधिकार्‍यांनी दिले मुख्याध्यापकांना निवेदन

नवी मुंबई : बातमीदार
वाशी येथील सेक्टर 16 ए मधील सेंट लॉरेन्स हायस्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांनी ’जय श्रीराम’ घोषणा दिल्यामुळे त्यांना शाळेतून काढून टाकल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत निषेध व्यक्त करण्यासाठी भारतीय जनता पक्ष, सकल हिंदू समाज, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थांचे पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिकांसमवेत शाळेच्या प्राचार्यांची भेट घेऊन निवेदन दिले.
सेंट लॉरेन्स शाळेत दहावीच्या वर्षातील दहा मुले बाथरूममध्ये गेली होती. त्यावेळी एकाने गंमत म्हणून जय श्रीराम म्हटले, मात्र त्याला प्रतिसाद देत इतर विद्यार्थ्यांनी जोरजोरात जय श्री राम म्हटले. हा आवाज तेथील काही शिक्षकांना ऐकू आला. शिक्षकांनी विद्यार्थ्याना विचारणा केल्यावर चार जणांनी उर्वरित सहा जणांची नावे शिक्षकांना सांगितली. शाळा प्रशासनाने तातडीने निर्णय घेत या सहा विद्यार्थ्यांना शाळेतून काढण्याचे पालकांना कळवले, मात्र पालकांनी विनवणी केल्यावर सहा पैकी चार जणांचे निलंबन मागे घेतले तर उर्वरित दोघांचा प्रश्न कायम आहे. याबाबत नवी मुंबई पालिका शिक्षणाधिकारी अरुणा यादव यांच्याशी याविषयी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी नंतर फोन करते असे म्हणत बोलण्यास नकार दिला.
सेंट लॉरेन्स हायस्कूल, सेक्टर 16 ए मधील सहा ते आठ विद्यार्थांना जय श्रीरामच्या घोषणा दिल्याबद्दल शाळेतून काढून टाकल्याची घटना घडली. याबाबत निषेध व्यक्त करण्यासाठी भारतीय जनता पक्ष, सकल हिंदू समाज, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थांचे पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिकांसमवेत शाळेच्या प्राचार्यांची भेट घेऊन निवेदन दिले. या वेळी भाजपाचे सामाजिक कार्यकर्ते विजय वाळुंज तसेच पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी प्राचार्यांनी विद्यार्थ्यांचे निलंबन आम्ही करणार नाही, असे आश्वासन उपस्थितांना दिले.

…अन्यथा निषेध आंदोलन करण्याचा इशारा
जर विद्यार्थ्यांसोबत अन्याय झाल्यास किंवा विद्यार्थ्यांना शाळेतून काढल्यास भारतीय जनता पक्ष, सकल हिंदू समाज आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक व कार्यकर्ते, मोठ्या प्रमाणात निषेध आंदोलन करू, असा इशारा स्थानिक भाजप पदाधिकारी विजय वाळुंज यांनी दिला.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply