Breaking News

ज्येष्ठ पत्रकार डॉ. सचिन पाटील यांचे निधन

अलिबाग ः प्रतिनिधी
अलिबाग येथील ज्येष्ठ पत्रकार व दैनिक रामप्रहरचे माजी संपादक डॉ. सचिन पाटील यांचे गुरुवारी (दि. 15) हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते 55 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी असा परिवार आहे.
डॉ. सचिन पाटील यांनी आपल्या पत्रकारितेची सुरुवात दै. महानगरमधून केली. दै. कोकण टूडे, दै. कुलाबा दर्पण, दै. रामप्रहरचे संपादक म्हणून त्यांनी काम पाहिले. त्याचप्रमाणे दै. सकाळच्या आवृत्ती प्रमुखपदाची जबाबदारी सांभाळली. दै. लोकमत, दै. महानगर, दै. जनशक्तिमध्ये उपसंपादकही म्हणून काम पाहिले.
डॉ. सचिन पाटील यांची अभ्यासू पत्रकार म्हणून ओळख होती. त्यांनी पीएचडी केली होती. त्याचबरोबर एलएलबी पदवीदेखील मिळविली. सध्या ते वकिल म्हणून कायद्याच्या क्षेत्रातही कार्यरत होते. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या निधनाबद्दल शोक व्यक्त होत आहे. दै. रामप्रहर परिवार त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे.

Check Also

खासदार सुनील तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

महायुतीकडून विजयाचा निर्धार अलिबाग : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांनी …

Leave a Reply